मंगळवार, १७ जुलै, २०१८

क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला

क्षण माझा होता तरीही ,
दूर दूर जात गेला
शांत बघत राहून मी ,
नशिबाचाही घात केला

अपेक्षांचे ओझे नुसते
खांद्यावरती पेललेले
निराशेचे कवडसे
कितीतरी झेललेले
दिशाहीन झालो होतो
जिकडे वारा वाहत गेला
क्षण माझा होता तरीही ,
दूर दूर जात गेला

कुणी अनोळखी वाटेवर
आपलेसे क्षणात होती
कुणी असून आपले माञ
क्षणात परके होऊन जाती
आयुष्याच्या पटलावर
कसला हा जाच लिहला
क्षण माझा होता तरीही ,
दूर दूर जात गेला

मिथक मायेच्या भोवऱ्यात हे
किती तरी देह उरले
मृगजळ ना हाती आले
आयुष्य माञ अक्खे सरले
चक्रव्युव्हात माझाही
असाच अभिमान्यु होत गेला
क्षण माझा होता तरीही ,
दूर दूर जात गेला 



कवि : दत्ता हुजरे
संग्रह  : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा