रविवार, १० मे, २०१५

ती थांबली होती

ती थांबली होती
मी नुसताच पहात होतो
ती शब्दात सांगत होती
मी तिच्यात गुंतलो होतो


घोंगावती तिचे ते
शब्द कानात माझ्या
भावना झाल्या नव्याने
पुनः आज ताज्या




खळी गालावरची तूझी
अजून तशीच आहे
सांगून टाक एकदा
ते मनात साचलेले


मी अजूनी तूझाच आहे
तू साद एकदा दे
क्षणात फुलेल नाते
तू हाक एकदा दे


जितकी अधीर तू
तितकाच मीही आहे
जवळ इतका तूझ्या मी
क्षणास विलंब आहे


सगळे विचार सारे
मनात घोळत होतो
ती थांबली होती
मी नुसताच पहात होतो 

 

 

कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा