सोमवार, १२ डिसेंबर, २०११

तु प्रेमबंधात तु ,तु स्वप्नरंगात तु

तु प्रेमबंधात तु
तु स्वप्नरंगात तु
या नभाच्या,या फुलाच्या
प्रत्येक गंधात तु

सारे फक्त पाहत राहतात

वादळाची सुरुवात ही
होते घोंगावत्या अंधाराने
संकट आधी दिसत नाही
डोळ्यावरील झापडाने

थेंब दवाचे

झोपलेल्या पाण्यावर
थेंब दवाचे साचलेले
विरघळुन गेले कधी 
पाण्यालाच न कळले

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

मावळता सुर्य.....

मावळता सुर्य आणि
डळमळीत मन
पेटलेले आहे समोर
विकारांचे रण ॥१॥

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

निराशेच्या वाटेवरती........

निराशेच्या वाटेवरती उंचच उंच दरडी
दुनियेची भिरभिरती नजर आहे करडी

गुरुवार, २१ जुलै, २०११