मंगळवार, ३० जून, २०१५

गालात हसणे तुझे ते

गालात हसणे तुझे ते
कधी मला कळलेच नाही
भोवती असणे तुझे ते
कधी मला उमजलेच नाही


येतसे वारा घेउन कधी
चाहूल तुझी येण्याची
कधी साद पडे कानी
तुझ्या छनन छन पैजणांची


कधी अबोला धरसी तु
लटकेच रागवुन पाहणे
कधी गुदगुल्या अंगावरती
अन केव्हा मोहक हसणे

अल्लड निरागस अवघी तु
चैतन्याचा बहार होती
यौवन तुझे अवीट लोभस
मदन कांतीचा पुतळा होती

इतका अबोला कसला धरला
सोडुन कुठे मजला गेली
तुझीच चाहुल भासते काधी
येताच झुळुक मंद ओली

मी अभागा इतका कसा
कसे मला उमजलेच नाही
गालात हसणे तुझे ते
कधी मला कळलेच नाही


कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

रविवार, २८ जून, २०१५

अन प्रवास इथेच संपला !!! भाग ३

सकाळी आलार्म वाजला तसे डोळे किलकिले करुन उघडत एक आळस भरला. पुन: रजाई अंगावर ओढत आज जावेच नाहि असे वाटत होते पण इतक्यात लखकन विज चमकावी तसा उठला ’अरे यार ती बस नाही मिस झाली पाहिजे हरी अप देव..... ती असेल का पण आज,.... ओय सकाळी सकाळी निगेटिव विचार नको करु असेल ती’ असे मनात व्दंद खेळत खेळत तो आवरु लागला. आज कधी नव्हे ते इतक्या लवकर आवरले.

शनिवार, २७ जून, २०१५

मन रितं होतं तरी

हिरवं झालं रान
पान पान बोलत होतं
मन रितं होतं तरी
हिंदोळ्यावर डोलत होतं


झोके हवेचे झरकन
अधुन मधुन येती
मोहरुन अंग माझे सारे
पानाफुलांना कवेत घेती


क्षण रोजच यावे असले
भान हरपुन सगळे जावे
गारवा इतका झोंबुन मला
मन स्पर्शाने गारठून यावे

इतका क्षण अस्वस्थ होतो
वाटते बेभान व्हावे पुन:
कधीच इतका खुललो नव्हतो 
जाग्या झाल्या जुण्या खुणा

कितीसे असे आयुष्या आपले
पावसाच्या सरीसारखे
झरझर झरझर झरुन जाते
एका क्षणात होते परके

ऋतु हा असाच आहे
मन अगदी लहान होतं
मन रितं होतं तरी
हिंदोळ्यावर डोलत होतं


कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

गुरुवार, २५ जून, २०१५

चांगले दिवस येतील, थोडी वाट आम्ही पाहू

चांगले दिवस येतील,
थोडी वाट आम्ही पाहू
तशी एकदा चाहुल द्या
सगळेच एका सुरात गाऊ


खुप काही लागत नाही
रोजच्या आमच्या जगण्यात
फक्त तुमची नजर फिरवा
सारे येऊ द्या एकदा बघण्यात

पावसाचे थेंब गहिरे

पावसाचे थेंब गहिरे

चिंब चिंब देहास केले

अंतरंग मनाचे त्या स्पर्शाने

क्षणात कसे न्हाऊन निघाले


गारवा तो अविट ओला

भारावुन गेला आज मजला

दाह किती तो कालचा

कुठेच उरला ना या क्षणाला

मंगळवार, २ जून, २०१५

मी रे तुळस अंगणातली आता असते अबोल

पैश्याशिवाय मानवा

ना दिले कशालाही मोल 

मी रे तुळस अंगणातली

आता असते अबोल


होता जिथे सडा

काल होती जिथे माया

आता पाणी ओतसी झारीने

माझी सुकली रे काया