मंगळवार, २ एप्रिल, २०१३

सोड हा अबोला


तु अबोल असता
चैन ना जीवाला
सारुनी हा रुसवा
सोड हा अबोला


क्षणक्षण कासावीस मी
तुजसाठी राणी
जणु, उन्हात फिरतो चातक
शोधीत शोधीत पाणी


त्रासले मन दुःखाने
आणिक या विरहाने
दाटुन येती नयनही
ग्रासले मज वैक्षम्याने


गोजिरि, तु लडिवाळी
रेशीम जणु हे मलमली
तरि प्राणप्रिया रे माझी
चुक अवचित हि झाली


आकांत करते आहे
दे दिलासा या मनाला
टाकुनी दे हा रुसवा
सखी, सोड हा अबोला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा