marathiblogs

हा ब्लॉग शोधा

बुधवार, ८ मार्च, २०१७

कोण असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

कोण असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

इकडुन तिकडे धावत
सारखी घरासाठी राबणारी
प्रत्येकाच्या आयुष्याला
असते तिच सावरणारी
काटा रुततो आपल्या पायी
तरि तिची पापणी होते ओली
आई असते ’ती’ तुझ्यामाझ्यातली

रविवार, १७ जानेवारी, २०१६

मिठीत घेता मला तु, वाटते अल्लड होउन जावं

मिठीत घेता मला तु,
वाटते अल्लड होउन जावं
अधीर ह्रदयाने तेव्हा मग
थोडं शांत शांत रहावं

सहवास लाभता प्रेमतरुचा 
मन चिंबचिंब न्हाउन निघावं
गोडगुलाबी गालावर या
खळीने जरा अजुन फुलावं

मंगळवार, ३० जून, २०१५

गालात हसणे तुझे ते

गालात हसणे तुझे ते
कधी मला कळलेच नाही
भोवती असणे तुझे ते
कधी मला उमजलेच नाही


येतसे वारा घेउन कधी
चाहूल तुझी येण्याची
कधी साद पडे कानी
तुझ्या छनन छन पैजणांची

शनिवार, २७ जून, २०१५

मन रितं होतं तरी

हिरवं झालं रान
पान पान बोलत होतं
मन रितं होतं तरी
हिंदोळ्यावर डोलत होतं


झोके हवेचे झरकन
अधुन मधुन येती
मोहरुन अंग माझे सारे
पानाफुलांना कवेत घेती

गुरुवार, २५ जून, २०१५

चांगले दिवस येतील, थोडी वाट आम्ही पाहू

चांगले दिवस येतील,
थोडी वाट आम्ही पाहू
तशी एकदा चाहुल द्या
सगळेच एका सुरात गाऊ


खुप काही लागत नाही
रोजच्या आमच्या जगण्यात
फक्त तुमची नजर फिरवा
सारे येऊ द्या एकदा बघण्यात

पावसाचे थेंब गहिरे

पावसाचे थेंब गहिरे

चिंब चिंब देहास केले

अंतरंग मनाचे त्या स्पर्शाने

क्षणात कसे न्हाऊन निघाले


गारवा तो अविट ओला

भारावुन गेला आज मजला

दाह किती तो कालचा

कुठेच उरला ना या क्षणाला

मंगळवार, २ जून, २०१५

मी रे तुळस अंगणातली आता असते अबोल

पैश्याशिवाय मानवा

ना दिले कशालाही मोल 

मी रे तुळस अंगणातली

आता असते अबोल


होता जिथे सडा

काल होती जिथे माया

आता पाणी ओतसी झारीने

माझी सुकली रे काया


रविवार, १० मे, २०१५

ती थांबली होती

ती थांबली होती
मी नुसताच पहात होतो
ती शब्दात सांगत होती
मी तिच्यात गुंतलो होतो


घोंगावती तिचे ते
शब्द कानात माझ्या
भावना झाल्या नव्याने
पुनः आज ताज्या


अवखळ तुझी अदा ही न्यारी

अवखळ तुझी अदा ही न्यारी
वेड लावले जीवास भारी


तू असते सभोवती तर
या जगाचा विसर पडतो
नसते तू जेव्हा बरोबर
या जगात मी एकटा उरतो
गुंफले नाते असे तू
पाहता तुज मन घेई भरारी
अवखळ तुझी अदा ही न्यारी
वेड लावले जीवास भारी


सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

रान हिरवं रे माझं

रान हिरवं रे माझं
तुझ्या ओल्या मायेखाली
कधी बहरुनी आलं
त्याचं भान मला नाही

शेत शिवार फुललं
येई आनंदा उधाण
गेली मरगळ सारी
गाती पाखरही गाणं

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

तुझ्यासाठी काळजात धकधक होते

शोधु हा$$ शोधु हा$$ शोधु तुला कुठे,

तुझ्यासाठी काळजात धकधक होते


थोडि गोडी गुलाबी, थोडा प्रेमशेम कर तु ,
ये जवळी अशी, मुझसे ना डर तु
नयन हे बोले तुझे, हे गुलाबी गाल,
हटके अदा तुझी, करी बेहाल
सांगतो मी खरे सारे, ना वादे झुठेमटे,
तुझ्यासाठी काळजात धकधक होते

गुरुवार, १ मे, २०१४

रडताना ह्रदय पाहतो तेव्हा,


रडताना ह्रदय पाहतो तेव्हा,
वाटते किती लाचार मी
होतांना अन्याय पाहतो तेव्हा,
जाणवते किती कमजोर मी

रविवार, २२ डिसेंबर, २०१३

तु मला सावरावे


स्थिरावलेल्या भावनांना
जागवशी आज तु नव्याने
न्हाऊन चिंब होऊन गेलो
प्रेमसरितेच्या ओलाव्याने

शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

राहुन गेले मनातले ते सांगितले ना कधी कुणाला


राहुन गेले मनातले ते
सांगितले ना कधी कुणाला
जीव माझा एकटा हा
आधांतरी इथे कोंडलेला

रविवार, १५ डिसेंबर, २०१३

जगण्याची फक्त आस असावी


काळजात विण विणली
श्वासाश्वासात गुंफुनी
हलकेच उलगडण्या मोह झाला
तर दिसली मज मनमोहिनी