क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला
अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले दिशाहीन झालो होतो जिकडे वारा वाहत गेला क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला
कुणी अनोळखी वाटेवर आपलेसे क्षणात होती कुणी असून आपले माञ क्षणात परके होऊन जाती आयुष्याच्या पटलावर कसला हा जाच लिहला क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला
मिथक मायेच्या भोवऱ्यात हे किती तरी देह उरले मृगजळ ना हाती आले आयुष्य माञ अक्खे सरले चक्रव्युव्हात माझाही असाच अभिमान्यु होत गेला क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला
मी खेळावे बागडावे हि मातीला रे आस किती करंटा रे मी माझ्या भाळी गळफास
काबाड कष्ट हे माझ्या पाची पुजलेले चिखल मातीने रे पाय रोज सजलेले पण लेक मी मातीचा कधी झाला नाही ञास तरी करंटा रे का मी माझ्या भाळी गळफास
शिवार फुलावे बहरावे मन आस लागलेले चिट पाखराने यावे काल थवे भेटलेले दिस परत ते यावे हे उरी माझ्या ध्यास किती करंटा रे मी माझ्या भाळी गळफास किती सण आले किती सण गेले माझी लेकरं बिचारी फक्त शिमगा पाहिलेले नको दिवाळी दसरा मिळो सुखाचे दोन घास किती करंटा रे मी माझ्या भाळी गळफास