शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

निराशेच्या वाटेवरती........

निराशेच्या वाटेवरती उंचच उंच दरडी
दुनियेची भिरभिरती नजर आहे करडी


एकटाच या वाटेवरती साथी गेले निघुन
विळख्यात सापडलो मी, जाईन का निभाऊन?

विचाराच्या गर्तेत सारखा बुडत आहे
डळमळीत बुध्दीने मी जगत आहे

व्दंद बुध्दी मनाचे चालले विवेकाला मारत
जरा जरा सावध, तरी झाली फसगत

धैर्य द्यायला आता कुणी तरी हवे
शोधतो आहे साथी नवे नवे

झुंज देतो आहे, मला मार्ग मिळेल?
निराशेच्या वाटेवरती चालताना सर्वांनाच कळेल.....

1 टिप्पणी: