मावळता सुर्य आणि
डळमळीत मन
पेटलेले आहे समोर
विकारांचे रण ॥१॥
दुदंभी आणि हाहाकार
नित्य इथे चालला
भौतिक प्रगतीने
मानवासुर माजला ॥२॥
रंगढंग, चालढाल
सर्वच बदलले
नियतिचे धागे
नित्याचेच ताणलेले ॥३॥
सैरवैर सैरवैर
धावत आहे चराचर
संस्कृती नाही इथे,
कुठे इथे नागर ॥४॥
विकृतीचे जडत्वाचे
चालले आहे तुफान
उजाडता सुर्य तरी
थांबवेल हे थैमान ॥५॥
डळमळीत मन
पेटलेले आहे समोर
विकारांचे रण ॥१॥
दुदंभी आणि हाहाकार
नित्य इथे चालला
भौतिक प्रगतीने
मानवासुर माजला ॥२॥
रंगढंग, चालढाल
सर्वच बदलले
नियतिचे धागे
नित्याचेच ताणलेले ॥३॥
सैरवैर सैरवैर
धावत आहे चराचर
संस्कृती नाही इथे,
कुठे इथे नागर ॥४॥
विकृतीचे जडत्वाचे
चालले आहे तुफान
उजाडता सुर्य तरी
थांबवेल हे थैमान ॥५॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा