सोमवार, ३ जून, २०१३

अगस्ती तो पुनः आला


उचंबळुनी तुज भरते आले
क्षणात होते क्षणात गेले
लेकरासम काल तु जपले
आज अचानक घरटे नेले


का आघोरी बनुन गेला?
आवकृपेचा बर्षाव केला
ना राग तुझा हा कळला
कुठल्याशा वणव्यात जळला

संसार हा अधांतरी
खेळलो तुझ्या उरावरी
तरी तु घात केला
रुसलास का माझ्यावरी?

आटली का रे ममता,
हे राजा समिंदरा
विनवितो मी तुला
हे प्रशांता करुणाकरा

ना होउन इतका अविचारी
नको करु तु शिरजोरी
अगस्ती तो पुनः आला
फिर आता तु माघारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा