सोमवार, ३ जून, २०१३

कर माती माझी ओली

आला माथ्यावर सुर्य
हा रे वैशाखाचा जोर
आग जीवाला ही जाळी
सोडी मन आता धीर


तापली ही धरणी
पडे भेगा अंगावर
सारं करपलं पीक
झाली कोरडी विहिर

पाण्याविन गती नाही
ना रे कसला आधार
जन सोसती या झळा
किती मोडले संसार

पाणी अमृत इथले
नाही पैशा गावणार
जरी उधळशी तु धन
नाही कृपा दावणार

मी रे फकीर होऊन
करतो रे पुढे झोळी
राजा वरुणा रे आता...
कर माती माझी ओली
कर माती माझी ओली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा