रडताना ह्रदय पाहतो तेव्हा,
वाटते किती लाचार मी
होतांना अन्याय पाहतो तेव्हा,
जाणवते किती कमजोर मी
हि तर आता रितच बनली
हिरमुसली कळीच भेटते मजला,
कारण ती कधीच नाही फुलली
अंधाराची का रे वाट वेगळी,
कधी शोधली नाही कुणीही
गर्त्यात गुंतलेला इसम बिचारा,
ना परत आला,पाहिला कुणीही
आक्रस्ताळा किती खरा हा,
रडणार्याचे अश्रुच खोटे
ज्याच्या नशिबी भोग लागले,
त्या बिचार्याचे हसुच खोटे
अशी कशी रे जगरहाटी,
उलटीच गणती चालली येथे
दैव म्हणुन रुसले कदाचित,
अन प्राण माझा कोंडला इथे
कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे
संग्रह : कवि मन माझे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा