रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

तुझ्यासाठी काळजात धकधक होते

शोधु हा$$ शोधु हा$$ शोधु तुला कुठे,

तुझ्यासाठी काळजात धकधक होते


थोडि गोडी गुलाबी, थोडा प्रेमशेम कर तु ,
ये जवळी अशी, मुझसे ना डर तु
नयन हे बोले तुझे, हे गुलाबी गाल,
हटके अदा तुझी, करी बेहाल
सांगतो मी खरे सारे, ना वादे झुठेमटे,
तुझ्यासाठी काळजात धकधक होते

कॉफीशॉप कॅंण्डीशॉप रोजची बिमारी,
तुझ्या प्रेमामध्ये माझी वाढली उधारी
भिरभिरती नजर तुझी, फेके कोनसा जाल,
बघ एकदा जरा, कर दिल मालामाल
करतो मी आटापीटा, जीव वेडा तुटे,
तुझ्यासाठी काळजात धकधक होते

 

 

कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा