अवखळ तुझी अदा ही न्यारी
अवखळ तुझी अदा ही न्यारी
वेड लावले जीवास भारी
तू असते सभोवती तर
या जगाचा विसर पडतो
नसते तू जेव्हा बरोबर
या जगात मी एकटा उरतो
गुंफले नाते असे तू
पाहता तुज मन घेई भरारी
अवखळ तुझी अदा ही न्यारी
वेड लावले जीवास भारी
स्वप्न अन भास तुझे हे
आता तर रोजचेच बनले
अधीर झालो इतका कसा मी
तुजशिवाय न काहीच उरले
स्पर्श करून मनाला माझ्या
दिली मला चैतन्य तरारी
अवखळ तुझी अदा ही न्यारी
वेड लावले जीवास भारी
कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा