रान हिरवं रे माझं
रान हिरवं रे माझं
तुझ्या ओल्या मायेखाली
कधी बहरुनी आलं
त्याचं भान मला नाही
शेत शिवार फुललं
येई आनंदा उधाण
गेली मरगळ सारी
गाती पाखरही गाणं
किती दिवस रुसला
अंती दया तुला आली
तु रे मायबाप माझा
केली माती माझी ओली
गंध गोड हा मातीचा
मी रे भरला उरात
गेला दुर हा थकवा
आलं बळ हे क्षणात
मी रे शेतीचा पुजारी
माझा शेतकरी धर्म
राजा वरुणा रे माझ्या
नको सोडु तुझे कर्म
कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा