शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

गुंतता गुंतता मन हे गुंतले कुठे

माझ्या वेड्या जीवाला
भ्रांत कधी नसे
गुंतता गुंतता मन 
हे गुंतले कुठे



कासावीस, निष्प्राण
जरी जीव होइ हैराण
आगडोंब सुर्याचा
दिसे रानोमाळ वैरान
तरी लहरी मन 
रान शोधी हिरवे
गुंतता गुंतता मन 
हे गुंतले कुठे


मकरंद शोधीतसे
जसे फुलपाखरु
अचाट भव्य अति
उभा दिनरात मेरु
जणु ह्याही उपमा
मन ठरवी तोकडे
गुंतता गुंतता मन 
हे गुंतले कुठे


भ्रांत, शांत जरी
वरवर असे
परी ठाव ना माहीत
हे कुठल्याकुठे
क्षणक्षणाला क्षणक्षणाला
जाई इथे तिथे
गुंतता गुंतता मन 
हे गुंतले कुठे







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा