रविवार, १ जानेवारी, २०१२

मन कुठेतरी दाटत राहतं

रडु एकदाचं बाहेर येतं
जेव्हा कुणीतरी भेटत राहतं 
ओलं ओलं वाटत राहतं 
मन कुठेतरी दाटत राहतं



दुःख वेगळं वेगळं प्रत्येकाचं
जगणं मात्र सारखच
समोर मांदियाळी असली तरी
लेकरु आईविना पोरकच


क्षणभर थांबुन जो तो 
आधार देऊन निघुन जातो
दिवस जसा सरुन जातो
डोंगर तितकाच रिता होतो


रहाट जसा फिरत जाइल
पोहरे येतील खाली होतील
दुभंगलेलं मन बावरं
धीट होउन उभारी घेइल


असे कितीतरी क्षण येतात
जगणं अस्थिर होतच राहतं
ओलं ओलं वाटत राहतं 
मन कुठेतरी दाटत राहतं

1 टिप्पणी:

  1. नमस्कार, आपला ब्लॉग मराठी ब्लॉग जगतशी जोडला गेलेला आहे. म. ब्लॉ.ज.ला भेट देणार्‍या वाचकांना आपल्या ब्लॉगची माहिती देण्यासाठी म.ब्लॉ.ज.चे ओळखचिन्ह आपल्या ब्लॉगवर अवश्य लावा. म.ब्लॉ.ज.च्या फेसबुक पेजला व ट्विटर पेजला देखील अवश्य भेट द्या.

    उत्तर द्याहटवा