रविवार, २२ एप्रिल, २०१२

एक आभाळ उथळ

एक आभाळ उथळ
शोधी जीवाचा पदर
पुसे धरतीला तुझे
का दाटते उदर?

सांगे धरतीही त्याला
माझी सोशीक रे जात
मी रे लेकराची माता
झेली अनेक आघात

लेका पडता सोकार
कासावीस होता जीवानी
फाडे मी रे पोट माझं
देइ निर्मळ पाणी

तो पेरितो रे धान
जपे जीवापाड बिज
दिसे शिवार भरलं
होइ कष्टाचं चीज

हे चाललं दिसोदिस
नाहि याला सिमाकाळ
पण आघात हा झाला
मी झाले रे बेताल

न करता विचार
केला दुषित शिवार
जीव गुदमरे माझा
होइ अंग थरथरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा