सोमवार, १२ डिसेंबर, २०११

तु प्रेमबंधात तु ,तु स्वप्नरंगात तु

तु प्रेमबंधात तु
तु स्वप्नरंगात तु
या नभाच्या,या फुलाच्या
प्रत्येक गंधात तु



प्रेम वेडे असे 
आळविते गीत हे
गंध फुलतो असा 
स्वर माझे प्रितीचे
बेभान होण्या,धुंद होण्या
दे मला साथ तु
तु प्रेमबंधात तु
तु स्वप्नरंगात तु


लागला नाद हा
तोडली मी बंधने
कोंडला प्राण हा
सांगती ही स्पंदने
साद देशी,या जीवाला
माझी होशील तु?
तु प्रेमबंधात तु
तु स्वप्नरंगात तु


अविट हे बोलणे
रुप तुझे साजिरे
हसताच पडते खळी
गोड तुझे लाजणे
याच बंधात गुंतलो मी
छेड हृदयास तु 
तु प्रेमबंधात तु
तु स्वप्नरंगात तु



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा