बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३

गुंताच होत गेला कोडे कधी न सुटलेहळवे रे मन माझे
कधी काळजात रुतले
गुंताच होत गेला  
कोडे कधी न सुटले


आसुसलेल्या आशेवरती
या सैरभर लाटा
मखमलीच्या आंथरलेल्या
कधीच सुकल्या वाटा
काळ लोटला असा कितीसा
मला कसे न कळले
गुंताच होत गेला
कोडे कधी न सुटले

या क्षणाला थांबुन जरासा
पुरे वाटला गोड विसावा
पण उसासे दाटुन येती
अन दुरदुर जाई गारवा
गहिवरलेल्या नयनामधुनी
बांध अचानक फुटले
गुंताच होत गेला
कोडे कधी न सुटले

रहाटपाळणे असेच फिरती  
जीवन पुन: त्या वळणावरती
नजर लागली क्षणात कसली
माझेच नसती माझ्याचभोवती
गोड उरल्या त्या आठवणी
मन तिथेच हरवले
गुंताच होत गेला
कोडे कधी न सुटले


कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा