शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

पहाट ओली जणु मखमली धुसर धुक्याच्या पंखाखाली


पहाट ओली जणु मखमली

धुसर धुक्याच्या पंखाखाली

कधी भरावी गोड हुडहुडी

आणि चढावी धुंदी नशेली


नवकिरणांच्या लाटेआधी

दवबिंदुना या स्पर्श कराया

रुखरुखलेले हात कधीचे

सरसावती कवेत घेण्या


ही गुंज पाखराची

पडते हळुच कानी

कोकिळेच्या कंठात फुलती

ओली पहाट गाणी


कलिका या कवेत निशेच्या

निद्राधीन कशा अजुनी

क्षितिजावर हि पसरली लाली

क्षणात येतसे आता उजाडुनी


आदित्याचे स्वागत करण्या

लगबग आता सुरुच झाली

धुसर धुक्याच्या पंखामधली

ओसरली हि पहाट ओली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा