चाललो मी दुरदेशी, स्वप्न घेऊनी उराशी
चाललो मी दुरदेशी,
स्वप्न घेऊनी उराशी
काळजात धडधड माझ्या,
येत आसवे डोळ्याशी
मन माझे गुंतलेले,
गहिवरुन मज येई
शिरशिरि अंगावरी,
दाटले त्या मेघांपरी
गंध इथले वेगळे ते,
श्र्वास घेऊन साचवी
हा प्रवास न संपणारा,
पुरतील का ते सोबती?
नवप्रभाती गुंज इथली,
रोज येतसे आर्त वाणी
कोकिळाचा तान सुर तो,
घुमतो मंदमंद आज कानी
नयनपटलावरती माझ्या,
चित्र ईथले कोरलेले
परतीच्या त्या वाटेवरती,
दिसतील रंग बदलेले
चाललो मी दुरदेशी,
स्वप्न घेऊनी उराशी
येइन पुन: परत तेव्हा,
नशीब असेल माझ्या पायाशी
कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा