गुरुवार, २५ जून, २०१५

पावसाचे थेंब गहिरे

पावसाचे थेंब गहिरे

चिंब चिंब देहास केले

अंतरंग मनाचे त्या स्पर्शाने

क्षणात कसे न्हाऊन निघाले


गारवा तो अविट ओला

भारावुन गेला आज मजला

दाह किती तो कालचा

कुठेच उरला ना या क्षणाला


थेंब जणु मोती टपोरे

सत्परंग ते आत घेउनी

धरतीशी मिलाप होताच

गंध हवासा जाती सोडुनी

 

किती उरात श्वास घ्यावा

दरवळ तो इतका अनोखा

झुळुक येते अशी अचानक

कधी हवेचा मंद झोका

 

आसमंत हे काळ्या ढगांचे

अंधारलेले असो कितीही

तरी मजला ते हवेसे

गडद असले किती जरिही

 

क्षणात जाती सारे विरुनी

सुर्यनारायण पुन: येती

पशु-पक्षी, मानव सारे

जिथल्या तिथे सगळे जाती  

 

 

कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा