सोमवार, २३ एप्रिल, २०१२

काळजाला पाझर फुटावा लागतो

पाण्याच्या प्रवाहात,जीवनाच्या दिशेत
बदल करता येउ शकतो
फक्त मातीचा व इच्छाशक्तीचा 
भक्कम बांध घालावा लागतो


विजेच्या कहरातुन, आगीच्या डोंबातुन
सही सलामत राहु शकतो
फक्त पुण्याईचा थोडा तरी
जोर असावा लागतो

सापाचा दंश, वाघाची हिंसा 
टाळता येउ शकते 
फक्त भीती सारुन मनात 
थोडी ताकद भरावी लागते

वार्‍याच्या व्दंदातुन, वणव्याच्या थरारातुन
भयकंप जरी पसरतो
तरी निसर्गाच्या ह्या वळणाचा 
अर्थ लावावा लागतो

चितेवर झोपावलेला परत 
एकदा उठु शकतो
फक्त, देवाच्या काळजाला
पाझर फुटावा लागतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा