बुधवार, २५ एप्रिल, २०१२

सावली, ही गार सावली


सावली, ही गार सावली
जणु पदराआड घेई माऊली


चैत्रपालवीचा बहर हा येऊन गेला
रखरखता रणरणता वैशाखवणवा पेटला


हिरवागार डौलदार बहरदार पालवा
क्षणाक्षणाला देई अमोघ गारवा


थवे मंदावती थोडावेळ विसाव्याला
मन जागा करुन देई चिवचिवटाला


झुळुक येई अवघी एक क्षणमात्राची
तरी देई भ्रांत पुर्ण विसाव्याची


नकळत खेळ खेळती पर्णशलाका बावर्‍या
ऊनसावली, मातीशी अन सुर्याशी आग ओकणार्‍या 


सावली, ही गार सावली
जणु पदराआड घेई माऊली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा