ना भ्रांत मला राहते
हा तुला पाहताना
ना भान माझे राहते
तु समोर असताना
मन गहिरे गहिरे कधी गुंतते
मन बावरे बावरे घुटमळते
ही सांजवेळ होतांना
लाली तीरावर पसरे
आठवणीच्या हिदोंळ्यावर
दिसे ओठ तुझे हसरे
मन पाहते पाहते रुप फसवे
मन बावरे बावरे घुटमळते
हा चांद वर येई
देई साथ स्वप्न फुलवताना
वारा मंद मंद होइ
हे स्वर तुझे ऎकतांना
मन गहिरे गहिरे पार बुडते
मन बावरे बावरे घुटमळते
काळोख रात्र असतांना
भान पुर्ण विसरे
तारे नभी लुकलुकतांना
रातकिडे सोधी आसरे
मन अधिर अधिर होई हळवे
मन बावरे बावरे घुटमळते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा