रविवार, १५ डिसेंबर, २०१३

ती पहाट ओली ओली, हळुच काही सांगुन गेली


ती पहाट ओली ओली,
हळुच काही सांगुन गेलीप्रिया तुझी ही,
जागी झाली
गुंज तिची रे,
मज ऎकू आली
पवन प्रभाती ह्या,
होउन अवखळ
का करतो आहे,
माझी चळवळ
साखरझोपेची नशा सारी,
केव्हाच उडाली
ती पहाट ओली ओली,
हळुच काही सांगुन गेली


दवबिंदुची लगबग,
सडा घालती मातीवरती
गोड गुलाबी थंडी आणिक,
मऊशार गादि ढगांवरती
काळोखाची विण उलगडूनी
लुप्त तारका होती क्षणाला
शुक्रचांदणी तरी अजुनी
साद घालती वेड्या मनाला
आदित्याची क्षणाक्षणाला
क्षितिजावर पसरते लाली
ती पहाट ओली ओली,
हळुच काही सांगुन गेली


क्षितिजावरचा तो मोरपिसारा,
दवांस वाटे तो निखारा
ऊब दाटुनी जागोजागी,
थंडिस भेटला नवा इशारा
दवबिंदुची अंघोळ लतिकांस,
न्हावुन तरतरीत जाग्या होती
झटकून थकवा दमात सारा,
पुन: एकदा बहार फुलवती
क्षणात नसे ते क्षणात येती,
पहाट होउन जात मखमली
ती पहाट ओली ओली,
हळुच काही सांगुन गेलीकवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा