रविवार, १५ डिसेंबर, २०१३

जगण्याची फक्त आस असावी


काळजात विण विणली
श्वासाश्वासात गुंफुनी
हलकेच उलगडण्या मोह झाला
तर दिसली मज मनमोहिनी


प्रतिबिंब माझे कोंडलेले
क्षणाक्षणाचे ते निखारे
का असेच साठत गेले?
दुरावलेले ते आयुष्य बिचारे

अमोल ठेवा हाती माझ्या
तरी मी का व्हावा अभागी?
नशिबाच्या प्रत्येक कडिला
नव्हती बुद्धी माझी जागी

करुण भावना जाग्या होता
मन माझे विव्हळ करती
असह्य वेदना त्या घडिच्या
दाटते ही अनामिक भीती

देत पुनः ठेवुन सगळा ठेवा
भुत भविष्य मोहिनी नसावी
वर्तमान हे सुकर करण्या
जगण्याची फक्त आस असावीकवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा