शनिवार, २१ डिसेंबर, २०१३

राहुन गेले मनातले ते सांगितले ना कधी कुणाला


राहुन गेले मनातले ते
सांगितले ना कधी कुणाला
जीव माझा एकटा हा
आधांतरी इथे कोंडलेला


प्राण गुंतला कधी हा
लावुन हुरहुर काळजाला
त्राण नाही राहिला आज
जीव आधीच पोळलेला

सोबतीला कालचे ते
आज परके या क्षणाला
जीवभाव तेव्हा होता
आज मात्र विसरलेला

अंतरिच्या दाटलेल्या
दुखःसरिता या वाहती
बांध घालु मी कशाचा
उरले ना काही सोबती

ह्या मनाची फरफट आता
दाहीदिशा अंधारलेल्या
हात ज्याचा खांद्यावरी
स्वार्थी भावना गुंतलेल्या

बदलण्याची आस होती
आज ना उरली कशाला
कुणासाठी आकांत केला
समजले कुणी ना पामराला

आशेचा तो झरोका
अजुन ना मावळलेला
मृगजळाच्या लागुन पाठी
म्हणुनच तर मी थांबलेला

शेवटि होणार तेच
दोष द्यावा नशिबाला
राहुन गेले मनातले ते
सांगितले ना कधी कुणाला



कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा