रविवार, २२ डिसेंबर, २०१३

तु मला सावरावे


स्थिरावलेल्या भावनांना
जागवशी आज तु नव्याने
न्हाऊन चिंब होऊन गेलो
प्रेमसरितेच्या ओलाव्याने


गंध नव्हता ना कधी
नव्हते कधी चैतन्य फुलले
येताच आयुष्यात तु माझ्या
एका क्षणात ते बहरले

पावसाच्या सरिही आज
अंगावरि घेण्या सरसावलो
आतुरता हि कधीच नव्हती
तुला भेटण्या मी आसुसलेलो

सौंदर्याने नटली धरती
दिसु लागले मोरपिसारे
क्षणाक्षणाला आठवणी त्या
मंदावले मन बिचारे

दाटलेले विचार सारे
काहुर करती या जीवाला
नको आता तो दुरावा
अन नको पुनः तो अबोला

दृष्ट लागो न कुणाची
प्रित अशीच बहरुन यावी
प्रेमभरते आज आले
धुंदिची ही लाट यावी

पाहताना मी तुला
जग असेच थांबुन जावे
चुकलो वाट कधी जरी मी
तु मला सावरावे,तु मला सावरावे



कवि : दत्ता हुजरे
संग्रह : कवि मन माझे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा