शेवटि
मनाचा हिय्या करुन त्याने बोलायचं ठरवलच आणि तिच्य़ाकाडे वळाला पण पुनः
पंचायत ’हिचं नाव काय आहे’, त्याने बुध्दिवर ताण देउन आठवण्याचा प्रयत्न
केला पण काहि केल्या तिचं नाव काय आहे ते आठवेना, शेवटी ’शुकशुक’ अशी साद
घातली पण तिकडुन काहिच प्रतिसाद नव्हता. दोन तिनदा परत प्रयत्न केला तरिही
काहिच नाही. ’हि बहिरी आहे काय,काय करु म्हणजे हि बघेल?’ असा मनात विचार
घोळत असतानाच त्याने तिला हात लावला. तशी ती गर्रकन वळुन एकदम गरजलीच, "काय
आहे?" इकडे मात्र जगदंबा अवतार पाहिल्यावर वाट लागली......